मुक्ताईनगर : प्रतिनिधी
मुक्ताईनगर येथे मोफत आरोग्य मेळावा शांततेत पार पडला. यावेळी खासदार रक्षा खडसे यांचे प्रतिनिधी चंद्रकांत भोलाने व आमदार चंद्रकांत पाटील यांचे प्रतिनिधी तालुका प्रमुख छोटू भोई उपस्थित होत.
यावेळी रुग्ण कल्याण समितीचे सदस्य गणेश टोंगे, प्रफुल्ल पाटील, अफसर खान, नगरसेवक वसंत भलभले, शुभम शर्मा, डॉ एन जी मराठे, डॉ योगेश पाटील, डॉ तेजस कोटेचा, डॉ वरून देव, वैद्यकीय अधीक्षक डॉ शिवदास चव्हाण, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ तोडसाम, डॉ भूषण पारील, डॉ प्रवीण बोदडे, डॉ शोएब खान, डॉ इम्रान खान, डॉ हेमंत जाधव, डॉ भारातभूषण पाटील, डॉ अमित घडेकर, सहायक अधिसेविका आशा चिखलकर, परिसेविका कल्पना नगरे, एम इ गावीत व आरोग्य मेळाव्यात तालुक्यातील पाचशे ते सहाशे रुग्णांणी लाभ घेतला. नव्वद लोकांनी आयुष्यमान भारतचे कार्ड तयार करून घेतले. प्रास्ताविक डॉ निलेश पाटील यांनी तर सूत्रसंचालन प्रदीप काळे यांनी केले. आभार वैद्यकीय अधीक्षक डॉ शिवदास चव्हाण यांनी मानले.