पाचोरा : प्रतिनिधी
गेल्या दहा दिवसांपासून राज्याच्या सुरू असलेल्या राजकीय खेळास आज बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्याने पुर्णविराम मिळाला असुन पाचोरा – भडगाव मतदार संघाचे आमदार किशोर पाटील हे देखील एकनाथ शिंदे यांच्या गटात सामिल असल्याने त्यांच्या समर्थकांनी दि. ३० जुन रोजी सायंकाळी ७ वाजता शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाक्यांची आतषबाजी करत व जोरदार घोषणाबाजी करत आनंदोत्सव साजरा केला. याप्रसंगी किशोर बारावकर, सुमित किशोर पाटील, विशाल राजपुत, राहुल पाटील, सागर पाटील, शिवदास पाटील, अक्षय जैन सह कार्यकर्ते उपस्थित होते.




















