जळगाव : प्रतिनिधी
शहरातील रामानंद नगर पोलीस स्थानकाच्या हद्दीत असलेल्या आशाबाबा कॉलनीत ५० वर्षीय एकाला त्याचा मुलासह काहीही कारण नसताना शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना घडली आहे. याबाबत गुरुवार ३० जून रोजी रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हरीविठ्ठल नगरातील रहिवासी मधुकर पंढरीनाथ पाटील (वय-५०) हे खाजगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतो. गुरुवार ३० जून रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास शहरातील आशा बाबा नगर येथे रेल्वे पुलाचा जवळून मुलगा कैलास याच्या सोबत जात असताना अज्ञात 3 जणांनी काहीही कारण नसताना शिवीगाळ करून मारहाण केली. तर सोबत असलेले त्यांचा मुलगा कैलास पाटील याला देखील काचेने पोटावर वार करूनच जखमी केले. या घटनेनंतर मधुकर पाटील यांनी रामानंदनगर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून रात्री १० वाजता रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शांताराम पाटील करीत आहे.




















