मुंबई : वृत्तसंस्था
जळगावमधील शिवसेनेचे आक्रमक नेते, गुलाबराव पाटील सध्या एकनाथ शिंदेंसोबत गुवाहाटीमध्ये आहेत. पाटील गुवाहाटीमध्ये शिंदेंच्या गटात दिसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. कारण, शिवसेनेचे आमदार फुटणार काय, या प्रश्नाच्या उत्तरात सुमारे अडीच वर्षांपूर्वी पाटील संतापून म्हणाले होते, ‘कोई माई का लाल फोड सकता है उनको?’ आता ते बंडखोर शिंदे यांच्यासोबत आहेत.
सब्जी मंडी थोडी है…
कोई बैंगन लेके जाए, कोई भरता लेके जाए. pic.twitter.com/YrG6YvL7YL— Prashant Sudamrao Jagtap (@JagtapSpeaks) June 22, 2022
राष्ट्रवादी काँग्रेसचे पुण्यातील नेते आणि माजी महापौर प्रशांत जगताप यांनी हा व्हिडीओ आपल्या ट्विटर हँडलवरून शेअर केला आहे. तो नेमका कधीचा आहे, याची मात्र माहिती नाही. व्हिडीओमध्ये पत्रकार हे गुलाबराव पाटील यांना शिवसेनेचे आमदार फुटू शकतात अशी भीती वाटते का? असा प्रश्न विचारतो. याच्या उत्तरात गुलाबराव पाटील म्हणतात, “कोई माई का लाल फोड सकता है उनको (आमदार)? फोडना है तो आ जाए सामने. ये सब्जी मंडी थोडी है के कोई बैंगन लेके जाए, कोई भरता लेके जाए… हिंमत है तो आ के ले जाए.” आज ते शिंदेंसोबत आहेत.




















