जळगाव : प्रतिनिधी
यावल तालुक्यातील शिरागड येथून मेहुण येथे जात असताना 11 वाजेच्या सुमारास गाते रेल्वे स्टेशनजवळील इस्सार पेट्रोल पंपाजवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली. त्यात ओम ढिवर याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी हंबरडा फोडला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केले जात असून नातेवाईकांनी हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त केला आहे.
रावेर ग्रामीण रुग्णालयात डॉ.अनिकेत चव्हाण यांनी मृतदेहाचे शवविच्छेदन केले.
