मुंबई : वृत्तसंस्था
सत्तासंघर्षाच्या खेळादरम्यान आणखी एक मोठी बातमी हाती आलीये. महाराष्ट्र सरकारने मुंबई पोलीस आयुक्तपदी विवेक फणसळकर यांची नियुक्ती केली. मुंबईचे सध्याचे पोलीस आयुक्त संजय पांडे हे उद्या निवृत्त होत आहे. त्यांची जागा विवेक फणसळकर घेणार आहेत. याआधी ते ठाण्याचे पोलीस आयुक्त होते.
1989 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी, फणसळकर मुंबई सीपी म्हणून नियुक्तीपूर्वी पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळाचे डीजी आणि एमडी म्हणून काम करत होते.2018 मध्ये, विवेक फणसळकर यांची परमबीर सिंग यांच्यानंतर ठाणे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली होती, या नियुक्तीपूर्वी, फणसाळकर हे २०१६ पासून मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अतिरिक्त महासंचालक होते. फणसळकर यांचं 2008 मधील ठाण्यातील काम सर्वांत गाजलं जेव्हा त्यांनी एका आठवड्यापासून दोन समुदायांमधील धार्मिक दंगल रोखली.
ठाण्यात फणसळकरांचा ‘दरारा’
विवेक फणसळकर यांची ३१ मार्च २०१८ रोजी ठाणे पोलीस आयुक्तलायात पोलीस आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला होता. सुमारे पावणे दोन वर्ष त्यांनी ठाणे शहर आयुक्त पदाचा कार्यभार सांभळला. करोना काळात जीवाची बाजी लावून जनतेचा जीव वाचण्याऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी त्यांनी पुढाकार घेतला होता. कर्तव्य बजावताना दुर्दैवी मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या मुलांना थेट नियुक्ती पत्र देण्याचा अभिनव उपक्रम त्यांनी राबविला होता. त्यांच्या या उपक्रमाचं राज्यभर कौतुक झालं होतं.




















