स्मार्टफोनमधील मोबाईल Data खूप लवकर संपतो अशी अनेक स्मार्टफोन युजर्सची तक्रार असते. काही युजर्स दररोज १.५ GB डेटा देखील पूर्ण वापरू शकत नाहीत, तर, काही युजर्सना साठी, दररोज ३ GB Data देखील कमी पडतो. याचे एक कारण तुमच्या फोनचे काही Apps आणि Phone Settings असू शकतात. तुम्हाला देखील २-३ GB daily Data पुरत नसेल. किंवा तो वेळेच्या आधीच संपून जात असेल तर काही ट्रिक्स यात तुमची मदत करू शकतात. यासाठी तुम्हाला खूप काही करावे लागणार नाही. फक्त तुमच्या स्मार्टफोनमधील काही सेटींग्स बदलाव्या लागतील. आज आम्ही तुम्हाला अशाच ५ सोप्या टिप्स सांगणार आहो. ज्या फॉलो करून मोबाईल डेटा वापर मोठ्या प्रमाणात कमी केला जाऊ शकतो. जाणून घ्या या सेटिंग्स आणि लगेच करा बदल.
WhatsApp चे हे सेटिंग बदला: WhatsApp प्रत्येकाच्याच फोनमध्ये आहे. आपण सर्वजण हे App आवर्जून वापरतो आणि त्यावर दिवसभर अनेक फोटोज तर कधी मित्र- मैत्रिणींनी पाठवलेले छोटे-मोठे आणि व्हिडिओज देखील पाहतो. अशात, जर तुमच्या व्हॉट्सअॅपमध्ये ऑटो डाउनलोड फीचर ओपन असेल, तर हे सर्व फोटो आणि व्हिडिओ आपोआप डाउनलोड होतात. पण, ऑटो डाउनलोड फीचर बंद केल्याने तुमचा बराचसा डेटा वाचू शकतो. यासाठी व्हॉट्सअॅपच्या सेटिंगमध्ये जाऊन स्टोरेज आणि डेटावर क्लिक करा आणि मीडिया ऑटो डाउनलोडमध्ये जा आणि नो मीडिया निवडा.
डेटा सेव्हर वापरा
डेटा सेव्हर वापरा: स्मार्टफोनमध्ये अनेक भन्नाट फीचर्स असतात. ज्याप्रमाणे फोनची बॅटरी वाचवण्यासाठी फोनमध्ये बॅटरी सेव्हरची सुविधा उपलब्ध आहे, त्याचप्रमाणे डेटा वाचवण्यासाठीही फोनमध्ये अशीच सुविधा उपलब्ध आहे. त्याला डेटा सेव्हर असे नाव देण्यात आले आहे. डेटा सेव्हर देखील एक भन्नाट सेटिंग आहे. तुम्ही तुमच्या स्मार्टफोनच्या सेटिंग्जमध्ये जाऊन ते शोधू शकता आणि तेथून ते data sever enable करू शकता. ही टीप वापरल्याने स्मार्टफोनमधील डेटा वेगाने संपणार नाही. आणि तुमच्या Data Pack मधील १.५ जीबी डेटा देखील व्यवस्थित पुरेल.




















