देशामध्ये नुकतेच निवडणूक होवून निवडणूकीचे निकाल हाती आले. यामध्ये भारतीय जनता पार्टीच सर्वांत मोठा पक्ष ठरला तर आम आदमी पार्टीने ही गेल्या सहा वर्षांत पंजाब राज्यामध्ये आपले वर्चस्व दाखवून सत्ता स्थापन केली. आज गोव्याचे मुख्यमंत्री पदी डॉ.प्रमोद पाडूरंग सावंत यांनी शपथ घेतली.
डॉ.शामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम मध्ये हा शपथ विधी सोहळा सूरु आहे.
भारतीय जनता पार्टीने यंदाच्या निवडणूकीतही आपले वर्चस्व दाखवून विरोधकांना शरण आणले आहे. तर शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी यूपीत व गोव्यामध्ये भाजपाचा पराभव करण्यासाठी कंबर कसली होती. तर युपीमध्ये राज्याचे मंत्री व युवासेनेचे अध्यक्ष ना.आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक झाली. मात्र मुख्यमंत्री योगींनी त्यांना हरविण्यात कुठलीही कसर सोडलेली नाही. तर दुसरीकडे गोव्याची जबाबदारी युवासेनेचे पदाधिकारी वरुण सरदेसाई यांना शिवसेनेकडून देण्यात आली होती. याठिकाणी राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला चितपट करण्यात यश संपादन केले. गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी डॉ.सावंत यांनी गोपनीयतेची शपथ घेण्याचा कार्यक्रम दि.28 रोजी ठरला होता. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्यासह अनेक नेते व पदाधिकारी उपस्थित होते.