जळगाव :प्रतिनिधी
शहरातील एका भागात राहणाऱ्या १८ वर्षीय युवतीचा हात पकडून विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, शहरातील एका भागात राहणारी १८ वर्षीय युवती आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. १८ जून रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास सैय्यद अकबर सैय्यद सलाउद्दिन याने तरूणीकडे पाहून डोळा मारला. त्यानंतर तिचा हात पकडून तिच्याशी अश्लिल वक्तव्य करून तिचा विनयभंग केला. हा प्रकार युवतीने नातेवाईकांना सांगितला. पिडीत युवतीने रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी सैय्यद अकबर सैय्यद सलाउद्दिन याच्यावर रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि रोहिदास गभाले करीत आहे.