मुक्ताईनगर : प्रतिनिधी
मतदार संघातील रखडलेल्या पुनर्वसन संदर्भात आज पुनर्वसन मंत्र्यांच्या दालनात महत्वपूर्ण बैठक घेण्यात आली असून, या बैठकीला पालकमंत्री गुलाबराव पाटील, पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, आ. चंद्रकांत पाटील सह जळगाव जिल्ह्यातील पुनर्वसन विभागातील अधिकारी वर्ग उपस्थित होते. या बैठकीत पुनर्वसन संदर्भात काही महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले तसेच निधी बाबत देखील चर्चा करण्यात आली.
बैठकीत काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. या निर्णयांमध्ये मुक्ताईनगर शहरातील ४१३ घरांचे बाकी असलेले पुनर्वसन संदर्भात चर्चा करण्यात आली. तसेच मंत्री महोदय यांनी अधिकाऱ्यांकडून तात्काळ अभिप्राय देखील मागवण्यात आले आहे. तसेच उर्वरित गावांमधील देखील पुनर्वसन संदर्भात अभिप्राय मागवलेला आहे व पुनर्वसन संदर्भात सकारात्मकता दर्शवली आहे. तसेच मतदारसंघातील काही आठ गावांचे निधीअभावी कामे रखडली होती. या बाबत देखील सकारात्मकता दाखवत अधिकारी यांच्याकडून अभिप्राय मंत्रीमहोदयांनी मागवलेला आहे.
मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील मुक्ताईनगर शहर, भोकरी, पातोंडी, सूलवाडी, कोलदा, अंतुरली, धामनदे, नरवेल, पिंपरी नांदू, बेलसवाडी, मेंढोदे (खडकाचे), उचंदा, मुंढळदे, मेळ सांगवे, पंचाने, खामखेडा, भामलवाडी, शिंगाडी, मांगलवाडी, कांडवेल, तांदलवाडी, ऐनपूर, पुरी गोलवाडे, घोडासगाव आणि चिंचखेडा बुद्रुक अशा २१ गावांचा समावेश आहे.
प्रत्येक ठिकाणचे पुनर्वसन झाले नंतर रस्त्याची दिशा बदलत असल्याने तसेच ज्या गावांचे पुनर्वसन झालेले आहे. तेथील दिशा बदलल्याने शेती रस्ता बंद होतो. त्यामुळे शेतकऱ्यांना अतोनात त्रास सहन करावा लागत असल्याने तात्काळ पुनर्वसन अंतर्गत शेती रस्ते मंजुरी संदर्भात देखील ठोस उपाययोजना होणे गरजेचे आहे. अशी बर्याच वर्षांपासूनची शेतकऱ्यांची मागणी आ. चंद्रकांत पाटील यांनी पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या कानावर घातली. त्या मागणीवर त्वरित अंमलबजावणी करून ठोस उपाययोजना करण्यात येतील असे आश्वासन मंत्री वडेट्टीवार यांनी दिले.
