नाशिक : आता पर्यंत आपण ऐकलं असेल कि माणसाची किंवा दोन गाड्याची समोरासमोर धडक होऊ शकते पण चक्क बिबटया ज्यावेळेस गाडी समोर येतो त्यावेळेस गाडी चालकचे काय हाल होतात हे कुणीही सांगू शकत नाही मन हादरवणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रस्त्या ओलांडताना बिबट्याला कारने धडक दिली. या कारच्या धडकेत बिबट्या बोनेटमध्येच अडकला. हा व्हिडीओ अक्षरश: अंगावर शहारे आणणारा आहे.
बिबट्या म्हटलं की नुसता घाम फुटतो तो बिबट्या अचानक गाडीसमोर आला तर चालकाचं काय होईल याचा विचार न केलेलाच बरा. असाच बिबट्या नाशिक-पुणे मार्गावर रस्ता ओलांडताना गाडीसमोर आला. कार चालकहीही घाबरला होता.
कार आणि बिबट्याची धडक झाली. या धडकेत बिबट्याचे पाय बोनेटमध्ये अडकले. बिबट्या आपला जीव वाचवण्यासाठी धडपड करू लागला. ही संपूर्ण घटना तिथल्या नागरिकांनी कॅमेऱ्यात कैद केली. बिबट्याचा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ नाशिक-पुणे मार्गावरचा असल्याचं सांगितलं जात आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बिबट्याची ही अवस्था पाहून तुम्हालाही दया येईल.




















