
जळगाव : प्रतिनिधी
ओम साई सेवा महिला मंडळातर्फे भाऊसाहेब राऊत विद्यालयातील ६२ विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप करण्यात आले यात महिला मंडळातर्फे ५० गणवेश तर श्री तुषार चावला यांच्यातर्फे १२ गणवेश असे एकूण ६२ गणवेश वाटप करण्यात करण्यात आले ओम साई महिला मंडळातर्फे विद्यालयात गत पाच वर्षांपासून विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप केले जात आहे.
अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री एल.एस.तायडे तर प्रमुख अतिथी म्हणून पर्यवेक्षक श्री.एस.एम.रायसिंग, श्री.ए.एस.बाविस्कर ओम साई सेवा महिला मंडळाच्या सौ.मिरा मंधान, सौ.रूपा वालेचा, सौ.वर्षा शिरवाणी, सौ.महेक मंधान, सौ.वर्षा मंधान, सौ.संगिता चावला, सौ.पौर्णिमा हासवाणी, सौ.हर्षा केसवाणी, सौ.गिता दारा यांची उपस्थिती होती प्रारंभी सरस्वती मातेच्या प्रतिमेस पूजन व माल्यार्पण करण्यात आले उपस्थितांचे स्वागत सौ.प्रमोदिनी बाविस्कर, सौ.संगिता शिरसाट, सौ.वैशाली नारखेडे यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश जाधव यांनी तर आभार प्रदर्शन श्री.सुवर्णसिंग राजपूत यांनी केले.




















