मुबई : वृत्तसंस्था
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या कालच्या सभेनंतर राजकारण चांगलच तापलं आहे. अशातच आता राज यांच्या अटकेची मागणी होतं आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून अद्याप यावर मनसेची प्रतिक्रिया आलेली नाहीये. मात्र कालच्या राज ठाकरेंच्या सभेनंतर राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे.
तर दुसरीकडे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड यांनी थेट राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली आहे. भेटीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी थेट राज ठाकरेंच्या अटकेची मागणी केली आहे. तर वाचा सविस्तर गायकवाड यांनी नेमकं काय म्हंटलं आहे.
माध्यमांशी बोलताना गायकवाड यांनी राज ठाकरेंच्या अटकेची मागणी करत त्यांच्यावर थेट जातीवाद पसरवत असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. ‘राज ठाकरे खोटा इतिहास सांगून राज्यात वातावरण बिघडवत आहेत. लोकमान्य टिळकांनी ना समाधीचा जीर्णोद्धार केला, ना शोधलेली आहे. महात्मा फुले यांनी सर्वप्रथम समाधी शोधली, असे त्यांनी सांगितलं आहे.
पुढे याबाबत बोलताना ते सांगतात, ‘पुण्यात छत्रपती शाहू महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं पहिलं स्मारक केलं. इंदौरचे होळकर आणि ब्रिटिशांनी खऱ्या अर्थाने १९१७ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची रायगडावरील समाधीचा जीर्णोद्धार केला, असे गायकवाड यांनी सांगितले आहे.
प्रवीण गायकवाड राज ठाकरेंवर टीका करताना म्हणतात, ‘राज ठाकरे चुकीचा इतिहास वाचून राजकारण करत आहेत. राज्यघटनेविरोधात त्यांचं धोरण असल्याच त्यांनी म्हंटलं आहे. याचबरोबर सामाजिक दृष्टीनं राज ठाकरेंचं राजकारण घातक असून राज्यघटनेविरोधात त्यांचं धोरण आहे, असे गायकवाड म्हणाले.
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी लोकमान्य टिळकांनी बांधल्याचं विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं होतं. याचाच धागा पकडत राष्ट्रवादीच्या जेष्ठ नेत्याने राज ठाकरेंचे दावे खोडून काढले आहे. ‘ज्या वेळी फुलेंनी समाधी शोधली, त्यावेळी टिळक केवळ 13 वर्षांचे होते,’ असे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ म्हणाले.
ते याबाबत माध्यमांशी बोलत होते. भुजबळांच्या या वक्तव्यावर आता मनसे कडून काय प्रतिक्रिया येतीये, हे पाहणे महत्त्वाच ठरणार आहे. भुजबळ म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शंभू राजेंनी बांधली. टिळकांनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी बांधली, हे धादांत खोटं आहे. ज्या वेळी फुलेंनी समाधी शोधली, त्यावेळी टिळक केवळ 13 वर्षांचे होते, असं भुजबळांनी यावेळी बोलताना सांगितलं.