
औरंगाबाद : वृत्तसंस्था
आज महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज सायंकाळी ‘ राजसभा’ होत आहे. यासभेत कुणा कुणाला व्हिडिओ लागणार याचीच चर्चा दोन दिवसापासून दिसत आहे.
‘ राज सभेमधील ‘ व्यासपीठावर दोन स्क्रीन लावण्यात आलेले आहे. यामधे ठाकरे आज कुणा कुणाचा समाचार घेतात. हे अद्याप कुणीही सांगू शकत नाही. पण राज्यात ठाण्याची सभा झाल्यानंतर ज्या ज्या नेते मंडळींनी राज ठाकरेंना उत्तर दिलेले आहे. त्यांचा नक्की व्हिडिओ या सभेत लागणार एवढे मात्र निश्चित आहे. या नेते मंडळींमध्ये मुख्यमंत्री ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, उपुख्यमंत्री अजित पवार, मंत्री जितेंद्र आव्हाड, शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यासह खा.इम्तियाज जलील यांचाही नंबर नक्की लागणार असल्याची चर्चा राजकीय पटलावर दिसत आहे.