औरंगाबाद : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा १ मे महाराष्ट्र दिनाला होणारं आहे या सभेपूर्वीच औरंगाबादमध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहे. औरंगाबादेत आजपासून ९ मे पर्यंत जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आले आहे. त्यामुळे निदर्शने, धरणे मोर्चा, मिरवणूक काढण्यास मनाई आदेश लागू झाले आहेत.१ मे रोजीच्या राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी मिळणार का? याची मोठी उत्सुकता आहे.
ठाकरे यांच्या सभेच्या तोंडावरच औरंगाबाद जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. आजपासून ९ मे पर्यंत हे आदेश लागू करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी दिली. पोलीस आयुक्त गुप्ता यांनी जामावबंदीचे आदेश देत ५ पेक्षा जास्त व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमण्यास, निदर्शने, धरणे मोर्चा, मिरवणूक काढण्यास मनाई आदेश काढला आहे.
तसेच मनसे प्रमुख राज ठाकरे यांची १ मे रोजी औरंगाबादमध्ये जाहीर सभा होणार आहे. त्यासाठी मनसेकडून जोरदार तयारी सुद्धा सुरु आहे. या सभेत राज ठाकरे पुन्हा एकदा मशिदीवरील भोंग्यांबद्दल बोलणार असल्याचा अंदाज वर्तावला जात आहे.
राज ठाकरे यांच्या सभेसाठी जय्यत तयारी
राज ठाकरेंच्या औरंगाबादमधील सभेसाठी मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते तयारीला लागले आहे. या तयारीमुळे सगळं लक्ष हिंदुत्व आणि भगव्यावरच दिसत आहे. मनसेची सभा १ मे रोजी औरंगाबादमध्ये होणार आहे. सभेला अजून परवानगीही मिळाली नाही. मराठवाडा सांस्कृतिक मैदानातच सभा घेण्यावर मनसे ठाम आहे. त्यामुळे आता सभेला परवानगी मिळणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.
म्हणून जमावबंदीचे आदेश
आदेशानुसार मनसेचे मंदिरासमोर हनुमान चालीसा कार्यक्रम आहे, त्याला राजकीय पक्षांचा विरोध आ. मुस्लिम समाजाचे आरक्षणासाठी आंदोलन होण्याची शक्यता आहे. तसेच औद्योगिक कामगार संघटनांकडून आंदोलन होण्याची शक्यता आहे. हिजाब मुद्द्याहून आंदोलन होण्याची शक्यता आहे. इंधन दरवाढी विरोधात आंदोलन होण्याची शक्यता आहे. औरंगाबाद शहर संवेदनशील असल्याने प्रतिबंधात्मक आदेश पोलिसांकडून जारी करण्यात आले आहेत. ही सगळी कारणे देत औरंगाबादेमध्ये जमावबंदी करण्यात आली आहे.
