जळगाव : प्रतिनिधी
शहरात सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असलेले रिद्धी जान्हवी फाउंडेशन हे नेहमी युवक व महिलांसाठी सातत्याने स्तुत्य उपक्रम राबवून सामाजिक कार्यात आपला ठसा उमटवीत आहे. यंदा फाउंडेशनमार्फत विद्यार्थ्यांना लॅपटॉप वाटप करण्यात आले आहे.
दि १९ रोजी रिद्धी जान्हवी फाउंडेशन व पुष्पाई मुरलीधर फेगडे फाउंडेशन मस्कावद ता. रावेर यांच्या संयुक्त विद्यमानाने विद्यार्थी ३०% अनुदानीत लॅपटॉप वाटप योजने अंतर्गत 3 लाभार्थी विद्यार्थ्यांना लॅपटॉपचे वाटप करण्यात आले.लाभार्थी विद्यार्थी एक मुलगी व दोन मुले अनुक्रमे १) शुभम विनोद दायमा पोलन पेठ, जळगाव (2) भुषण प्रकाश कासार शनी पेठ, जळगाव असून रिद्धी जान्हवी योजनेतून लॅपटॉप वाटप करण्यासाठी फाऊंडेशनच्या अध्यक्षा चित्रलेखा मालपाणी व पुष्पाई मुरलीधर फेगडे फाउंडेशनचे अध्यक्ष किरण मुरलीधर फेगडे हे उपस्थीत होते. त्याच्या मार्फत लाभार्थ्यांना लॅपटॉप चे वाटप करण्यात आले.