जळगाव : प्रतिनिधी
शहरातील एमआयडीसी परिसरात एका ठिबकच्या कंपनीतील गाडीवर चालक म्हणून असलेल्या एका युवकाने ठिबक नळ्यांच्या मालाची डीलीव्हरी केल्यानंतर आलेली रक्कम घेऊन पसार झालेल्या चालकास एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने नेरी येथून अटक केली आहे.

मिळालेली माहिती अशी की, एमआयडीसी परिसरातील ठिबक नळ्या तयार करणा-या कंपनीत पंकज सोनवणे हा चालक म्हणून कामाला होता. गेल्या वर्षी सन 2021 मधे कंपनी व्यवस्थापक चिराग शहा यांनी चालक पंकज सोनवणे यास जालना येथील तिघा व्यापा-यांकडे ठिबक नळ्या घेऊन रवाना केले होते. जालना येथील तिघा व्यापा-यांकडून जमा करण्यात आलेली एकुण रक्कम 2 लाख 81 हजार 400 रुपये त्याने कंपनीत जमा केली नाही. आपल्या ताब्यातील बोलेरो पिक अप वाहन एमआयडीसी परिसरात लावून तो पसार झाला होता. याप्रकरणी व्यवस्थापक चिराग शहा यांनी 5 मार्च 2021 रोजी एमआयडीसी पोलिस स्टेशनला त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.