जळगाव : प्रतिनिधी
शहरातील मेहरूण तलावाजवळ दारू पित असलेल्या तरूणांना हटकल्याचा राग आल्याच्या कारणावरून दिनेश भिकन पाटील (वय-४४) रा. रामेश्वर कॉलनी याचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना ९ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली होती. या गुन्ह्यातील दोन जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. यामध्ये तांबापुऱ्यातील आनंद सदाशिव माळी (वय-२१) व एकजण अल्पवयिन संशयित आरोपी आहे.
सविस्तर असे कि, रामेश्वर कॉलनीतील रहिवासी दिनेश भिकन पाटील (वय-४४) हे आपल्या परिवाराचा एका कंपीनीत काम करून उदर्निवाह करत होते. शनिवार ९ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास ते मेहरूण तलावाजवळील एका नाल्याजवळ ते दुचाकी (एमएच १९ बीएक्स १४९७) ने आले आणि दारू पिण्यासाठी एकांत बसलेले होते. याच ठिकाणी दुसऱ्या बाजूला आनंद माळी (वय-२१) रा. तांबापूर आणि एक १५ वर्षीय अल्पयीन मुलगा देखील दारू पित होते. यावर दिनेश पाटील यांनी एवढ्या लहान वयात दारू पिताय तुम्ही उठा येथून असे म्हणून हटकले असता. याच बोलण्याचा राग आल्याने दोघांनी दगडाने ठेचून खून करून फरार होण्यात यशस्वी झाले होते.
याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या गोपनिय माहितीनुसार पोलीस उपनिरीक्षक अमोल देवडे, सहाय्यक फौजदार अशोक महाजन, पोहेकॉ विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, सुधाकर आंभोरे, अक्रम शेख, पो.ना. राहूल पाटील, विजय पाटील, प्रितम पाटील, भारत पाटील, विजय चौधरी, दर्शन ढाकणे यांनी संशयित आरोपी दुलेश्वर उर्फ आनंद सदाशिव माळी (वय-२१) रा. तांबापूर आणि एक १५ वर्षीय अल्पयीन मुलगा यांना तांबापूरा परिसारातून अटक केली आहे. दोघांना न्यायालयात हजर केले असता २० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.




















