चाळीसगाव :प्रतिनिधी
चाळीसगाव एज्युकेशन सोसायटी च्या बी.पी. आर्टस, एस.एम.ए.सायन्स अेॅड के.के.सी. काॅमर्स काॅलेज आणि के.आर.कोतकर ज्युनिअर काॅलेज, चाळीसगाव आयोजित कै.मांगीलाल गोवर्धनदास अग्रवाल २९ व्या राज्यस्तरिय आंतरमहाविद्यालयीन विज्ञान प्रश्नमंजूषा स्पर्धेचे पारितोषिक वितरण दि.२३ एप्रिल रोजी महाविद्यालयात मा. राजेश पाटील (आयुक्त, पिंपरी चिंचवड) यांच्या शुभ हस्ते पार पडले. पारितोषिक वितरण समारंभाचे अध्यक्ष संस्थेच्या मॅनेजिंग बोर्डाचे चेअरमन मा. नारायण अग्रवाल होते. प्रमुख उपस्थितांमध्ये स्मिता पाटील, संस्थेचे सचिव डॉ. विनोद कोतकर, सिनिअर काॅलेज कमिटी चेअरमन डॉ. एम.बी.पाटील, संचालक अेॅड. प्रदीप अहिरराव, संचालक तथा उद्योजक मा. योगेश अग्रवाल, संचालक मा. राजेंद्र चौधरी, संचालक मा.सुरेश स्वार, मा. प्रशिल अग्रवाल, प्राचार्य डॉ. मिलिंद बिल्दीकर, विज्ञान मंडळ प्रमुख डॉ. विजय बाविस्कर यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. मिलिंद बिल्दीकर यांनी केले तर स्पर्धेवषयीचे मनोगत डॉ. विजय बाविस्कर यांनी केले
राजेश पाटील (आयुक्त, पिंपरी चिंचवड) यांच्या शुभ हस्ते विजयी संघांना पारितोषिके देण्यात आली. या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक रु. ५००० व फिरता चषक – एम. जे. कॉलेज , जळगाव या संघाने पटकावला. दुसरे पारितोषिक रु. ३००० हे बी. पी. आर्टस् , एस. एम. ए. सायन्स अेॅड के. के. सी. कॉमर्स कॉलेज , चाळीसगाव यांनी तर तिसरे पारितोषिक रु. २००० हे नानासाहेब यशवंतराव नारायण चव्हाण महाविद्यालय, चाळीसगाव यांनी व उत्तेजनार्थ पारितोषिक रु. १००० हे के. आर. कोतकर ज्युनिअर कॉलेज चाळीसगाव यांना मिळाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. सौ. पूनम निकम व प्रा. मनिषा सूर्यवंशी यांनी केले. आभार महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. प्रकाश बाविस्कर यांनी मानले.