एरंडोल : प्रतिनिधी
येथील जहांगिरपुरा परिसरातील ३४ वर्षीय विवाहितेने घरातील दुसऱ्या मजल्यावर गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली आहे.
येथील जहांगिरपुरा भागात रूपाली विश्वनाथ पाटील वय ३४ वर्ष या विवाहितेने घरातील वरच्या मजल्यावर गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २३ एप्रिल २०२२ शनिवार रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली आहे. रूपालीने घरातील पंख्याला साडीने गळफास घेतलेला आढळून आला याबाबत त्यांचे पती विश्वनाथ पाटील यांनी एरंडोल पोलीस स्टेशनला खबर दिली आहे.