जळगाव : प्रतिनिधी
येथून जवळ असलेल्या शिरसोली येथे राहणाऱ्या २५ वर्षीय विवाहितेला घरगुती वादातून लाकडी मोगरीने मारहाण करून दुखापत केल्याची घटना घडली आहे. याबाबत रविवारी २४ जुलै रोजी दुपारी ४ वाजता पती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिरसोली येथील ओमनगरात शिला संतोष घोडेस्वार (वय-२५) या आपल्या पती संतोष रघुनाथ घोडेस्वार यांच्यासह राहायला आहे. रविवार २४ जुलै रोजी सकाळी ८ वाजता शीला व तिचे पती संतोष यांच्यात घरगुती कारणावरून वाद झाला. या वादामध्ये पती संतोष याने घरात असलेली लाकडी मोगरी विवाहितेच्या डोक्याला मारले. यामध्ये विवाहिता ही गंभीर जखमी झाले, त्यांना तातडीने जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. दरम्यान विवाहितेच्या जबाबावरून पती संतोष रघुनाथ घोडेस्वार यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल जितेंद्र राठोड करीत आहे.
