जळगाव : प्रतिनिधी
विवाहितेवर चरित्र्याचा संशय घेवून शिवीगाळ केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात पतीसह सासरकडील मंडळींविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव शहरातील एका भागात २३ वर्षीय महिला यांचा विवाह पारोळा तालुक्यातील हिवरखेडी तांडा येथील तरूणाशी रितीरिवाजानुसार झाला. दरम्यान, लग्नाचे सुरूवातीचे दिवस चांगले गेले. त्यानंतर पती नेहमी पत्नीवर चरित्र्याचा संशय घेत होता. अनेक वेळा विवाहितेस तिच्या नातेवाईकांनी पतीसह सासरकडील मंडळींना समजावून सांगितले. त्यानंतर महिलेच्या पतीने तिच्या अंगावरील स्त्रीधन काढून घेत अश्लिल शिवीगाळ करून छळ करण्यास सुरूवात केली.
तसेच मोबाईल फोडून नुकसान केले. अखेर या छळाला कंटाळून विवाहिता माहेरी निघून आल्या. सोमवारी १३ जून रोजी दुपारी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात पती, सासू, सासरे, दीर, नणंद, जेठ आणि जेठाणी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस नाईक रविंद्र पाटील करीत आहे.