जळगाव : प्रतिनिधी
शहरातील मेहरुण परिसरातील नशेमन कॉलनीतील सैय्यद हुसेन शाहीद हुसेन हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास आहे. संशयित तौसिफ शाह तफज्जुल शाह रा. सालार नगर हा इसम सैय्यद हुसेन यांच्या घरी जावून त्यांच्या पत्नीकडे वाईट नजरेने बघून तीची छेडखानी करीत होता. तसेच तिला व्हाट्सऍपवर मॅसेज व व्हिडीओ कॉल करुन तिला त्रास देत होता. या त्रासाला व तौसिफच्या छळाला कंटाळून त्या विवाहितेने २३ मार्च रोजी छताच्या पंख्याला ओढणीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी चौकशी करुन सैय्यद मुजाहीद हुसेन शाहीद हुसेन याच्या फियादीवरून संशयीत आरोपी तौसीफ शहा तफज्जूल शाह याच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि दीपक जगदाळे हे करीत आहे.





















