
निंभोरा : प्रतिनिधी
येथील पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश धुमाळ,पोहेकॉ विकास कोल्हे, चालक श्री.चौधरी व त्यांच्या सहकाऱ्यांसमवेत तपासकामी सिंगत गावाहून जात असतांना रस्त्याने पावसात भिजत त्यांना वेडसर इसम जात असताना आढळला.त्याची चौकशी करीत असताना तो काहीच बोलत नव्हता.
तसेच वेडसर हरकती करीत असल्याने त्याला निंभोरा पोलीस ठाण्यात आणले.त्यानंतर त्याला जेवायला देत सपोनि गणेश धुमाळ यांनी विचारपूस करीत बोलते केले.त्यावरून त्याने चिखल्या या नेपानगर येथील असल्याचे सांगितले. त्यावरून धुलकूट पोलीस ठाण्यात निंभोरा पोलिसांनी संपर्क साधत त्याच्या कुटुंबियांना बोलावून घेतले. सदर इसमाचे नाव मगन बिलाल असून त्याचे वडील बारसिंग बिलाल यांनी सदर मुलगा हा १५ दिवसापासून घरून गेला असल्याचं सांगून वेडसर असल्याचे सांगितले.निंभोरा पोलीस ठाण्याचे सपोनि गणेश धुमाळ व सहकाऱ्यांचे आभार मानत त्यांनी आपल्या मुलाला सोबत घरी नेले.




















