जळगाव : प्रतिनिधी
शहरात आज राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे आगमन झाल्याने राष्ट्रवादी पक्षात आज आनंदाचे वातावरण दिसून आले. शहरातील आकाशवाणी चौक येथील जिल्हा कार्यालयाबाहेर शरद पवार हे सकाळी १०. ३५ वाजेच्या सुमारास आले.
यावेळी युवक कॉंग्रेसने चार क्विंटल फुलांचा हार शरद पवार यांना स्वागतानिमित्त अर्पण करून ढोल-ताशांच्या गजर, गुलाबाच्या पाकळ्यांची उधळण आणि जोरदार घोषणाबाजीत शरद पवार यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी रवींद्रभैया पाटील, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, सुनील माळी, विनोद देशमुख, मनोज वाणी, राजू मोरे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.