
जळगाव ः प्रतिनिधी
शहरात एक परिसरातील नाल्यात 40 ते 50 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह नाल्यात वाहून आल्याचे आज सकाळी 9 ते 9.30 वाजेच्या सुमारास आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार शहरातील पिंप्राळा परिसरातील केदार नगर जवळ असलेल्या एका नाल्यात 40 ते 50 वर्षीय अनोळखी व्यक्ती मृतदेह वाहून आल्याचे येथील नागरिकांना आढळून आले त्यानंतर येथील काही नागरिकांनी पोलिस प्रशासनाला फोन करून या घटनेची माहिती दिली असल्याचे समजते. याबाबत अधिकृत माहिती अद्याप समजलेली नसून पोलिस घटनास्थळी पोहचल्यावर याबाबत तो व्यक्ती कोण आहे व या नाल्यात कसा पडला हे अद्याप कळू शकलेले नाही.
रामानंद नगर पोलिस स्थानकाचे पोलिस निरिक्षक विजय शिंदे, पीएसआय शांताराम पाटील, आरपीएसओ बारेला संपूर्ण डीबीपथक घटनास्थळी दाखल झाले.




















