
चाळीसगाव : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाची नवीन कार्यकारणीची निवड करण्यात आली. यावेळी सचिन चव्हाण यांची अध्यक्षपदी, राजेंद्र वराडे व शारदा महाले यांची उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. निवडणूक निरीक्षक म्हणून श्यामजी ठाकरे यांनी काम पाहिले. त्यांच्यासोबत अजय सोमवंशी अजित चौधरी, गोविंदा लोखंडे, गणेश लोडते उपस्थित होते.
संजय पवार (माजी अध्यक्ष) यांच्या अध्यक्षतेखाली दि.९ रोजी महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाची नवीन कार्यकारणीची निवड करण्यात आली. यावेळी राकेशकुमार चित्ते सचिवपदी, योगेंद्र राजपुत व भूषण गुंजाळ सहसचिवपदी, राहुल पाटील संघटनमंत्री पदी, नितीन पाटील प्रसिद्धी प्रमुखपदी, प्रशांत महाजन कोषाध्यक्ष पदी, हिशोब तपासनीसपदी मनोज सूर्यवंशी, जिल्हा कार्यकारिणी सदस्यपदी महेंद्र पाटील, संजय पवार व नाना मोरे यांची निवड करण्यात आली. तसेच इतर पदाधिकारी शिक्षकांची कार्यकारणी सदस्यपदी निवड करण्यात आली. निवडीप्रसंगी तालुक्यातील अनेक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधु-भगिनी उपस्थित होते.




















