जामनेर : प्रतिनिधी
येणाऱ्या २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत ओबीसीचाच मुख्यमंत्री झाला पाहिजे. पुर्व काळात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मनातील स्वराज्य निर्माण करण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्याच शिवराय, फुले, आंबेडकर, शाहु यांच्या विचारानेच प्रेरीत असलेले राज्य मात्र निर्माण होऊ शकले नाही. याचा खेद महाराष्ट्रातील जनतेला आहे. यापुढील काळात महाराष्ट्राच्या विकासासाठी व योग्य विचारासाठी राज्यात ओबीसीचाच मुख्यमंत्री झाला पाहिजे, या माध्यमातून ओबीसीची ताकद महाराष्ट्रातील जनतेला कळेल, असे आवाहन ओबीसीचे नेते तथा महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे प्रदेशाध्यक्ष कल्याणराव दळे यांनी केले.
जामनेर तालुका नाभिक समाज मंडळ, श्री. संत सेना महाराज बहुऊद्देशिय संस्था जामनेर तसेच महाराष्ट्र नाभिक महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील पुरूषोत्तम नगरातील नाभिक समाज मंदिरात संतशिरोमणी सेनामहाराज यांच्या ५८७ व्या जयंतीनिमित्त श्रीसंत सेना महाराज यांच्या पुर्णाक्रुती मुर्तीची प्राण प्रतिष्ठा सोहळा आयोजित करण्यात आलेल्या जळगाव जिल्हा नाभिक समाज मेळाव्या प्रसंगी ते बोलत होते.
याप्रंसगी व्यासपिठावर नाभिक महामंडळाचे राज्याध्यक्ष कल्याणराव दळे, कार्याध्यक्ष दामोदर काका बिडवे, महिला प्रदेशाध्यक्षा भारती सोनवणे, जिल्हाध्यक्ष रविद्र नेरपगारे, कर्मचारी जिल्हाध्यक्ष ह. भ. प. मनोहर खोंडे, महिला जिल्हाध्यक्षा संगिता गवळी, भारती राऊत, जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी बहाळकर, उमाकांत निकम, प्रशांत बाणाईत, चद्रकांत शिदे, सरचिटणिस रविद्र शिरसाठ, सहायक कार्यकारी अभियंता एस. आर. राऊत, राज्य कार्यकारणी सदस्य सुनिल बोरसे, सुधाकर सनांसे, संजय पवार, राजकुमार गवळी, रामभाऊ गागुर्डे, जगदीश वाघ, भैय्या वाघ, मधुकर सैदाणे, विवेक वखरे यांच्या सह जिल्ह्य़ातील सर्व तालुकाध्यक्ष उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरवातीला सेना महाराज नाभिक समाज मंडळाच्या वतीने संतश्रेष्ठ सेना महाराज यांच्या मुर्तीची सवाद्य मिरवणुक रथ यात्रा, अभिवादन सोहळा, वास्तु व मुर्ती पुजन, शुरविर जिवा महाले चौक नामकरण, संतशिरोमणी सेना महाराज मंदिर लोकार्पण सोहळा जामनेर नगरीच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा साधना महाजन, उपनगराध्यक्ष प्रा. शरद पाटील, महेद्र बाविस्कर, अतिष झाल्टे, जितेंद्र पाटील सुहास पाटील, बंटी वाघ, माजी नगरसेवक रवींद्र महाजन, तसेच सन्माननीय नगरसेवक जामनेर यांच्या हस्ते पार पाडण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चंद्रकांत शिदे, अनिल शिंदे, तानाजी धांडे फत्तेपूर, मधुकर वाघ, श्री संत सेना बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष साळुंके गुरुजी, शिवाजी शिंदे, राजेंद्र निकम, विजय राऊत, विनय कोंडे, शरद वासनकर, शिवाजी निकम, प्रवीण निकम, विश्वास पर्वते, श्रावण बोडरे, आत्माराम शिंदे, सुनील जाधव, सुपडु सोनवणे, अरूण बिडके, अनिल पवार, यश निकम, गजानन पवार, वासुदेव शिंदे, जयंत पर्वते, कैलास वाघ, नाना पवार, अमोल शिंदे पारधी, शिवाजी राऊत शेंदुर्णी, रमेश धांडे फत्तेपूर, किशोर राऊत तोंडापूर, योगेश शिरसागर नेरी यांनी परीश्रम घेतले.