जळगाव : प्रतिनिधी
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नगरातील शिवसेनेच्यावतीने शिवसेनेच्या ५६ व्या वर्धापन दिनानिमित्त नागरिकांसाठी विजय संजय राठोड यांनी “मोफत नेत्र तपासणी शिबीर” आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात प्रभागातील जवळपास शेकडो नागरिकांनी तपासणी करून घेतली.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महापौर जयश्रीताई महाजन, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे व महानगरप्रमुख शरद तायडे यांची विशेष उपस्थिती होती तर
विभागातील समन्वयक अंकुश कोळी,विभाग प्रमुख विजय बादल, माजी नगरसेवक संजय राठोड, कार्यालय प्रमुख संजय सांगळे, अमोल सांगोरे, अॅड. सत्यजित पाटील,ज्येष्ठ शिवसैनिक प्रकाश व्यास, गणेश मोझर, सोहम विसपुते,समीर खाटीक उपस्थित होते.
या शिबिराला डॉ.शरद पवार व नितीन गोहील(विनायक ऑप्टिकल),विशाल वाघ,गणेश अंभोरे,दीपक नाझरकर,भरत कोचुरे,मयूर गवळी,छोटू परदेशी,रोहित पवार,प्रवीण पगारे,उमर शेख प्रमोद पाटील,घनश्याम लोहार,योगेश पाटील,शुभम ठाकरे यांनी मोलाचे सहकार्य केले.कार्यक्रमाची प्रस्तावना समाधान पाटील व आभार पंकज व्यास यांनी मानले.