जळगाव ः प्रतिनिधी
शहरात 26 मार्च रोजी एकाच दिवशी दोन खुन झाल्यानंतर शहर हादरले होते. त्याघटनेला आठ दिवस उलटत नाही तोच शहरात शिवाजी नगरातील हुडको परिसरात आज पुन्हा खुन झाल्याने शिवाजी नगर परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सविस्तर वृत्त असे की, शहरातील शिवाजी नगर परिसरातील हुडकोमधील मोहंमद मुसेफ शेख इसाक ( वय ४०) यांच्यावर रात्री आठच्या सुमारास चॉपर हल्ला झाला. यात मोहंमद यांचा मृत्यू झाला असून हल्लेखोर फरार झाले आहे. हा हल्ला नेमका कुणी केला याची माहिती समोर आली नसली तरी यामुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. याबाबत पोलीसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला आहे. मुसेफ हा हुडको परिसरात राहून हमाली काम करीत कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवित होता. गेल्या वर्षभरापासून तो रिकामाच असल्याने परिसरात फिरत असे. मुसेफचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला आहे. नागरिक जात असताना घटना लक्षात आली. घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्यक अधीक्षक कुमार चिंथा, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजय ठाकूरवाड यांच्यासह पथक पोहचले आहे. मयताजवळ चॉपरचे कव्हर, एका शस्त्राची मूठ, रुमाल असे साहित्य पडले आहे.





















