जळगाव : प्रतिनिधी
घराशेजारी सुरु असलेले भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या प्रौढ व्यक्तीच्या डोक्यात लोखंडी वस्तू मारून दुखापत केल्याची घटना शिवाजीनगर हुडको येथे घडली. याबाबत शहर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, शहरातील शिवाजीनगर हुडकोतील साईबाबा मंदिराजवळ हेमंत गोविंदा सोनवणे (वय-५२) हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहेत. ते हातमजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात. २० एप्रिल बुधवार रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास त्यांच्या घराच्या शेजारी राहणारे मनिष बिऱ्हाडे रा. शिवाजी नगर, हुडको आणि योगेश सरदार रा. मुंबई यांचे आपसात भांडण सुरू होते. सुरू असलेले भांडण पाहून हेमंत सोनवणे यांनी सोडवण्याचा प्रयत्न केला. याचा राग आल्याने योगेश सरदार आणि मनीष बिऱ्हाडे रा. शिवाजीनगर हुडको यांनी हेमंत सोनवणे याला शिवीगाळ करून मारहाण केली तर एकाने लोखंडी वस्तूने डोक्यात वार करून दुखापत केल्याची घटना घडली. जखमीस तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.
हेमंत सोनवणे यांच्या फिर्यादीवरून रात्री १२ वाजता संशयित आरोपी योगेश सरदार आणि मनीष बिऱ्हाडे यांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक ललित भदाने करत आहे.