
जळगाव : प्रतिनिधी
शहरातील ४० वर्षीय युवकाचा राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी २८ जुलै रोजी दुपारी ३ वाजता उघडकीला आली आहे.
मिळालेली माहिती अशी की, समता नगरातील भरत रमेश आंबेकर (वय-४०) हा पत्नी सविताबाई व दोन मुलांसह वास्तव्याला आहे. हातमजूरी करून आपल्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह करत होता. आज गुरूवारी २८ जुलै रोजी भरतची पत्नी सविताबाई ह्या कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या तर दोन्ही मुले शाळेत गेले होते. त्यामुळे घरी एकटे होते. दुपारी ३ वाजेच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली.
आत्महत्या केल्याची माहिती मिळताच रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी अंती मयत घोषीत केले. याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी सविताबाई आणि कल्पेश व किरण हे दोन मुले आहेत.





















