
जळगाव : प्रतिनिधी
जिल्हाधिकारी कार्यालय पुरवठा विभाग जळगाव आणि तहसील कार्यालय धरणगाव, एरंडोल आयोजित ग्राहक प्रबोधन जनजागृती पर पथनाट्य कार्यक्रम समर्थ बहुउद्देशीय संस्था जवखेडे बु. तालुका एरंडोल जिल्हा जळगाव यांच्या वतीने राबवण्यात आला.
ग्राहकांची दुकानदारांकडून फसवणूक होऊ नये ग्राहकांना आपले अधिकार माहीत असायला हवे तसेच आताच्या ऑनलाइन युगात लोक शॉपिंगही ऑनलाइन करतात व केव्हा केव्हा फसवले जातात जर ग्राहकांची कुठल्या कंपनीने किंवा दुकानदाराने फसवणूक केली तर ग्राहक हा ग्राहक न्यायालयात धाव घेऊ शकतो या स सर्व विषयांवरील प्रबोधन पथनाट्यातून समर्थ बहुउद्देशीय संस्थेचे कलाकार यांनी पाळधी, धरणगाव, एरंडोल येथे केले.
ह्या कार्यक्रमासाठी सुनील सूर्यवंशी साहेब जिल्हा पुरवठा अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव ,कुलकर्णी साहेब , मनोरे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.
पथनाट्य समर्थ संस्थेचे अध्यक्ष योगेश लांबोळे, उपाध्यक्ष महेश कोळी, सचिव विशाल जाधव तसेच भावेश पाटील ,सागर सदावर्ते ,रवी परदेशी, कृष्णा बारी, अक्षय पाटील, मयुरी जाधव, खुशबू जाधव, रोहिणी निकम, यांनी काम केले




















