जळगाव ः प्रतिनिधी
शहरात सर्व समाजमंदिरांना सुसज्ज जागा व मंदिर मनपाने बांधून दिलेले आहे. त्याच प्रकारे लिंगायत समाजाला अजूनही जळगाव शहरात कुठलेही समाजमंदिर नाही त्यामागणीसाठी लिंगायत समाजातर्फे आज दि.23 रोजी महापौर व उपमहापौर यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, शहरात विविध समाजाला मनपाने समाजमंदिर उभे करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिलेली आहे. तसेच समाजातील संताचे मंदिरेही उभे करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे जळगाव शहरात लिंगायत समाजाचे महात्मा बसवेश्वर लिंगायत समाज बहुउद्देशिय संस्थेलाही समाज मंदिर उभे करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी, या मागणी निवेदन समाजातर्फे महापौर जयश्रीताई महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांना दिले आहे.
यांनी दिले निवेदन
म.बसवेश्र्वर लिंगायत समाज बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष संदिप बसवे (वाणी), समिरभाऊ गुळवे, मनिष खांदे, सोमनाथ पतंगपुरे, संदिप मिटकरी, प्रमोद वाणी, गणेश चौधरी, राजु पाटील यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.