कमी वेळेत लोकप्रिय ठरलेले अभिनेते म्हणजे कुशल बद्रिके, सागर कारंडे, भारत गणेशपुरे, भाऊ कदम आणि श्रेया बुगडे रसिकांचे मनोरंजन करण्यात कोणतीही कसर सोडत नाहीत. मात्र आता सागर कारंडे व भारत गणेशपुरे हे चला हवा येऊ द्या सोडणार ? असे समजते.
‘झी मराठी’वरील लोकप्रिय शो ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाने सर्वांना चांगलेच वेड लावले आहे. अगदी लहान मुलांपासून ते वृद्ध नागरिकांनी या कार्यक्रमाला डोक्यावर घेतले आहे. थुकरटवाडीतील प्रत्येक विनोदवीर रसिकांचे धम्माल मनोरंजन करत असतो. रसिकांना ते पोटधरुन हसवतात. कॉमेडीचे भन्नाट टायमिंग यामुळे चला हवा येऊ द्या हा शो तुफान लोकप्रिय ठरला आहे.
तसेच या कॉमेडी शोमधून रसिकांना खळखळून हसवणारा तसंच त्यांची सगळी दुःख विसरायला लावणारे आणि तुफान मनोरंजन करणारे कॉमेडी अभिनेते सागर कारंडे आणि भारत गणेशपुरे यांनी देखील आपल्याला चांगलेच वेड लावले आहे. मात्र काही दिवसांपासून हे दोघांनी ‘चला हवा येऊ द्या’ शो सोडल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे.
चला तर मग जाणून घेऊया नेमकं यामागील सत्य काय..?
लवकरच हिंदी सोनी वाहिनीवर एक नवा कॉमेडी शो सुरु होत आहे. या कार्यक्रमात अभिनेते सागर कारंडे आणि भारत गणेशपुरे हे दोघेही सहभागी होणार आहेत. शनिवार-रविवारी दोन दिवस हा कार्यक्रम प्रसारित केला जाणार आहे. त्यामुळे चाहते सध्या प्रचंड खुश आहेत.
भारत गणेशपुरे आणि सागर कारंडे यांच्या चाहत्यांसाठी खुशखबर म्हणजे, हे दोघेही सोनीच्या नव्या कॉमेडी शोमध्ये विनोद करताना दिसणार आहेत. मात्र त्या नवीन कार्यक्रमामुळे ते चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात ते दिसणार नसल्याची चर्चा सुरु सध्या मोठ्या प्रमाणात झाली आहे.
मात्र आम्ही तुम्हाला सांगतो, की यामध्ये काहीही तथ्य नाहीये. याचे कारण असे की, या दोन्ही शो च्या शूटिंगचे दिवस हे वेगळे आहे. यामुळे दोघांनाही दोन्ही शो मॅनेज करता येणार आहेत. त्यामुळे नाराज होण्याचे काहीही कारण नाहीये. सागर कारंडे आणि भारत गणेशपुरे हे ‘चला हवा येऊ द्या’मध्ये देखील आपल्याला दिसणार आहेत.
