मुक्ताईनगर :प्रतिनिधी
सातपुड्याच्या दुर्गम भागात अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामाची मोठी गरज आहे. डाकिण प्रश्नासह अनेक छोट्या मोठ्या अंधश्रद्धातुन या परिसरात मोठ्या प्रमाणात शोषण होत असते व अंधश्रद्धा फोपावत आहेत. अनेक दिवसांपासून मोलगी येथे महा.अंनिसची शाखा असावी यासाठी प्रयत्न सुरू होते. दरम्यान १६ एप्रिल रोजी मोलगी येथे शाखा कार्यकारिणीची स्थापना करून प्रत्यक्ष कामाची सुरुवात झाली. या साठी सुमित्रा वसावे व शितल वसावे यांनी प्रयत्न केल्यामुळे एक चांगली व हक्काची टीम मिळाली आहे. याप्रसंगी मोठ्यासंख्ये कार्यकर्ते उपस्थित होते.
आधी राज्य सरचिटणीस विनायक सावळे यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कामाचे स्वरूप समजून सांगितले. त्या नंतर जिल्हा प्रधान सचिव किर्तीवर्धन तायडे यांनी शाखा व त्याचे विभाग, कार्यवाह आणि त्या अंतर्गत कामे व उपक्रम याची माहिती दिली. स्थानिक प्रश्न व अंधश्रद्धा या विषयावर सर्वांशी चर्चा करता आली. व सर्वानुमते शाखा कार्यकारिणीची निवड करण्यात आली.