शिर्डी : वृत्तसंस्था
राज्यात 10 वी आणि 12 वीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचं लक्ष आता निकालाकडे लागून राहिलं आहे. निकालाचे दिवस जसजसे जवळ येतायेत, तसंतसं विद्यार्थ्यांची धाकधूक वाढतेय. दरम्यान शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी 10 वी आणि 12 वीच्या निकालाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
“बारावीचा निकाल पुढच्या आठवड्यात तर 15 दिवसांनी म्हणजेच जूनच्या तिसऱ्या आठवड्यात दहावीचा निकाल लागेल”, अशी माहिती वर्षा गायकवाडांनी दिली. त्या शिर्डीत पत्रकार परिषदेत बोलत होत्या.
यंदा कोरोनानंतर 2 वर्षांनी पहिल्यांदाच दहावी-बारीवीची परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आल्या. दहावीची परीक्षा 15 मार्च ते 4 एप्रिल या कालावधीत पार पडली. तर 12 वीच्या लेखी परीक्षेचं आयोजन हे 4 मार्च ते 30 मार्च या काळात करण्यात आलं होतं.
