
जळगाव मिरर | २८ मे २०२५
चुचांळेकडून चोपडा श-हराकडे येत असलेल्या दुचाकीस्वारावर चोपडा पोलिसांनी कारवाई केली. त्या दुचाकीस्वाराकडून १० किलो गांजा जप्त करण्यात आला असून त्याच्याविरुद्ध चोपडा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरात दुचाकीवरुन गांजाची वाहतुक होत असल्याची माहिती चोपडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी सपोनि एकनाथ भिसे, पोहेकॉ संतोष पारधी, लक्ष्मण शिगाणे, रितेश चौधरी, ज्ञानेश्वर जवागे, पोना संदिप भोई, पोकॉ विनोद पाटील, निलेश वाघ, महेंद्र पाटील यांचे पथक रवाना केले. या पथकाने मंगळवारी सकाळच्या सुमारास चुंचाळे रोडवरील एमएसडबल्यू महाविद्यालयाजवळ सापळा रचला.
यावेळी चुंचाळेकडून चोपड्याकडे येत असलेल्या (एमपी ४६, एमडब्लू ६५८५) क्रमांकाच्या दुचाकीस्वाराला थांबवले. त्याची कसून चौकशी केली असता, त्याच्या दुचाकीवर बांधलेला स- ाडेदहा किलो गांजा जप्त करण्यात आला. याप्रकरणी दुचाकीस्वार कालुसिंग गोराशा बारेला (वय २६, रा. महादेव, ता शिरपुर, जि. धुळे) याला ताब्यात घेत त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईनंतर पोलिसांनी घटनास्थळी फॉरेन्सिक मोबाईल व्हॅन पाचारण केले. त्यातील तज्ज्ञांच्या पथकाने तपासणी केली. संशयिताकडे सुमारे २ लाख ३० हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.