भंडारा ः वृत्तसंस्था
तब्बल 150 किलो वजनाचा पाच फूट उंच आणि पाच फूट लांबीचा पुष्पा नामक बोकडाची सध्या सोशल मिडीयावर खुपच चर्चा रंगली आहे. भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्याच्या चांदोरी गावातील ग्रामपंचायतीचे सदस्य देवाजी हातझाडे यांच्याकडे 25 महिने वयाचा पुष्पा नामक बोकड आहे. तो तब्बल 150 किलो वजनाच्या या बोकडाची अंगकाठी 5 फूट उंच व 5 फूट लांब आहे. त्याला बघितल्यावर भल्याभल्याचा थरकाप उडतो. आता तुम्ही म्हणाल हा पुष्पा खातो तरी काय तर याला रोज खायला कुडवा भर तांदूळ व कुडवा भर गहू लागतो. त्यामुळे त्याला खरेदीसाठी एकच झुंबड चांदोरी गावात उडाली आहे.
मालक म्हणतो झुकेगा नही साला
आता या पुष्पाचा तोरा बघता त्याच्या मालकाने किंमत 2 लाख रुपये ठेवली आहे. मात्र व्यापाऱ्यांनी लावलेली बोली किंमत लक्षात घेता मालक देवाजी हातझाडे ‘झुकेगा नही साला’ म्हणत किंमत सोडायला तयार नाही. त्यामुळे लाखोची बोली असलेल्या पुष्पाची चर्चा सध्या राज्यात सुरु झाली आहे. या पाच फूट लांब पाच फूट उंच असलेल्या भंडारा जिल्ह्यातील एकमेव असलेल्या बोकडाला बघण्यासाठी एकच झुंबड जिल्ह्यातून चांदोरी गावात उडाली आहे. हातझाडे यांच्या घरी बघ्यांची गर्दी दररोज पाहायला मिळत आहे. त्यामुळे एक सेलिब्रेटी प्रमाणे असलेला पुष्पा आता भंडारा जिल्ह्यात फेसबुक आणि इंस्ट्राग्रामवर दिसायला लागला आहे. त्यामुळे संपूर्ण देशात फेमस असलेला पुष्पा प्रमाणे भंडारा जिल्ह्यातील ‘पुष्पा’ ही फेमस झाला आहे.