
जळगाव मिरर । ३ डिसेंबर २०२२
शहरातील गणेश कॉलनी परिसरातील रहिवाश्याच्या घरात घुसत चोरट्यांनी घरफोडी केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील गणेश कॉलनी परिसरातील शिवसागर बिल्डींगमध्ये तन्मय पदमाकर पिले (वय ४१) व्यवसाय लॉन्डीचालक आपल्या परिवारासह वास्तव्यास आहे. ते दि २ रोजी ते घरी नसताना अनोळखी चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाज्याचा कुलूप तोडून घरात प्रवेश करीत गोदरेज कपाटातील ७० हजार रुपये रोकड तर १ लाख ३९ हजार रुपये किमतीचे सोने चांदीचे दागिने लंपास केले आहे. या प्रकरणी जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोउनी गणेश देशमुख हे करीत आहेत.




















