जळगाव मिरर | ८ ऑक्टोबर २०२४
शहरातील आयोध्या नगरातील बिस्मिल्ल चौकात २२ वर्षीय तरुण हा मित्राशी फोनवरती बोलत असताना तीन जणांनी येऊन चापटाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून धारवार वस्तूने गंभीर दुखापत केली. ही घटना शनिबार दि ५ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री १ वाजता घडली. याप्रकरणी रविवार दि. ६ ऑक्टोबर रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील गायत्री नगरात जय जितेंद्र सोनवणे (वय २२) हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शनिवार दि. ५ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री रात्री १ वाजता जय सोनवणे हा आयोध्या नगरातील दुर्योत्व मंडळापासून विस्मिल्ला चौकत फोनवर मित्राशी बोलत होता. यावेळी संशयित अनिश पटेल रा. बिस्मिल्ला चौक, जळगाव आणि त्याचे दोन अनोळखी मित्र यांनी येऊन जय सोनवणे बाला लाथाबुञ्वयांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याजवळ असलेल्या धारवार वस्तूने मारहाण करून जखमी केले, ही घटना घडल्यानंतर जग सोनवणे यांती एमआयडीसी पोलिसात घेऊन तक्रार दिली. त्यानुसार रविवार दि. ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी संशयित अनिश पटल रा. बिस्मिल्ला चौक आणि त्यांचे दोन अनोळखी मित्र पूर्ण नाच माहित नाही. यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास तपासी अंमलदार सहायक फौजदार विजय पाटील करीत आहे.