
चाळीसगाव : कल्पेश महाले
पारोळा तालुक्यातील रताळे येथील २३ वर्षीय तरुण बेपत्ता झाल्याची घटना घडली असून पारोळा पा स ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत विशाल छोटू धनगर (वय २३) हा दिनांक ८ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास कुणाला काहीही न सांगता निघून गेला. त्याचा परिसरात तसेच नातेवाईकांकडे तपास केला असता मिळून आला नाही. याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात रोशन छोटू धनगर यांनी फिर्याद दिल्यावरून हरविल्याची नोंद झाली आहे. पुढील पोलीस प्रदीप पाटील हे करीत आहेत.





















