जळगाव : प्रतिनिधी
गणेशोत्सवाला बुधवारपासून उत्साहात सुरुवात झाली. उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था राखली गेला पाहिजे यासाठी पोलिस दलाकडून गेल्या महिनाभरापासून नियोजन सुरू होते. गुन्हेगारी कृत्यात सातत्याने सहभागी होत असलेल्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई सुरू होत्या. दरम्यान, यातील २८ गुन्हेगारांपासून शहरातील शांततेस धोका निर्माण हाेत असल्याचे निकर्ष काढण्यात आले होते. या २८ जणांना १० दिवसांसाठी शहरातून हद्दपार करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी काढले.
हे आहेत २८ गुन्हेगार : सतीश विलास तायडे, विनोद विलास तायडे (दाेघे रा. जाकीर हुसेन कॉलनी), अक्षय उर्फ बाब्या बन्सीलाल धोबी (कोळीवाडा, पिंप्राळा), स्वप्निल मधुकर कोळी (म्युनसीपल कॉलनी), विशाल भिका कोळी (कोळीवाडा, पिंप्राळा), अरबाज दाऊद पिंजारी (हरिविठ्ठलनगर), हरीश बाळू सपकाळे (जाकीर हुसेन कॉलनी), राजेश भीमराव साळुंखे (समतानगर), आशिष संजय सोनवणे (समतानगर), दानिश बाशित पिंजारी (खंडेरावनगर), समीर सलीम शेख (आझादनगर, पिंप्राळा हुडको), सद्दाम जुम्मा पिंजारी, राम उर्फ बारकू संतोष भोई, लखन संतोष भोई (तिघे रा. खंडेरावनगर), महेंद्र समाधान सपकाळे (बौद्धवाडा, पिंप्राळा), पृथ्वी उर्फ भावड्या दुबल्या उर्फ देवेंद्र करोसिया (समतानगर), सचिन अभयसिंग चव्हाण (प्रबुद्धनगर, पिंप्राळा), सचिन उर्फ सनी दादाराव अडकमोल (समातानगर), किरण दादाराव अडकमोल (समतानगर), रणजितसिंग जिवनसिंग जुन्नी (राजीव गांधी नगर), शक्तिसिंग जीवनसिंग जुन्नी (राजीव गांधी नगर), नीतेश मिलिंद जाधव (मढी चौक, पिंप्राळा), कुलदीप उर्फ सोनू पोपट आढाळे (समतानगर), नीलेश उर्फ सुपडू चंद्रकांत ठाकूर (मढी चौक, पिंप्राळा), मोहसीन खान उर्फ शेंबड्या नूरखान पठाण (आझादनगर, पिंप्राळा हुडको), शाहरुख उर्फ गुड्डु शेख रफिक (आझादनगर, पिंप्राळा हुडको), राकेश मिलिंद जाधव (मढी चौक, पिंप्राळा) अादींचा समावेश अाहे.
अवैध दारू विक्रेत्यांवर पाेलिस पथकातर्फे कारवाई
उत्सवाच्या काळात अवैध दारू विक्री करू नये म्हणून प्रकाश चंद्रकांत कंजर (खंडेरावनगर), विश्वास अरुण गारुंगे (समतानगर), गणेश गंगाराम सपकाळे (कोळीवाडा, पिंप्राळा), रवींद्र विश्वनाथ कोळी (म्युनिसिपल कॉलनी), कपिल रमेश सपकाळे (कोळीवाडा पिंप्राळा) व अशोक बाळू कोळी (समतानगर) या सहा जणांविरुद्ध पाेलिस दलाच्या पथकाने दारुबंदी अधिनियमानुसार कारवाई करण्यात आली.