जळगाव मिरर | १४ एप्रिल २०२५
यावल तालुक्यातील थोरगव्हाण या गावात जुन्या भांडणाच्या कारणावरून वाद झाला. आणि या वादातून एका २८ वर्षीय महिलेला दोघांनी शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच तिला व तिच्या मुलास जीवे ठार मारून टाकण्याची धमकी दिली. तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दोन जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, यावल तालुक्यातील थोरगव्हाण गावातील रहिवासी रेश्मा विनोद सपकाळ (वय २८) या विवाहितेला जुन्या भांडणाच्या कारणावरून शिवाजी सुकलाल सपकाळे व प्रमिला शिवाजी सपकाळे या दोघांनी शिवीगाळ करून मारहाण केली. लाथाबुक्याने मारत तिला व तिच्या मुलास जीवे ठार मारून टाकण्याची धमकी दिली. तेव्हा या प्रकरणी सदर महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलिसांना दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार अर्जुन सोनवणे करीत आहे.