जळगाव मिरर | २९ सप्टेंबर २०२३
जगभरात आज ईद-ए-मिलाद-उन-नबीनिमित्त आयोजन करण्यात आले असतांना पाकिस्तानातील बलुचिस्तानमधील मशिदीजवळ शुक्रवारी आत्मघाती हल्ला झाला. यामध्ये 34 जणांचा मृत्यू झाला, तर 130 जण जखमी झाले. मृतांमध्ये एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचाही समावेश आहे. ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीसाठी लोक जमत असताना हा हल्ला झाला. डीएसपी नवाज गिश्कोरी यांच्या कारजवळच हा स्फोट झाला.
At least 34 people killed, over 130 injured in suicide blast in Pakistan's restive Balochistan province
— Press Trust of India (@PTI_News) September 29, 2023
जिओ न्यूजच्या माहितीनुसार, या हल्ल्यात डीएसपी नवाज गिश्कोरी यांचा देखील मृत्यू झाला आहे. बलुचिस्तानचे काळजीवाहू माहिती मंत्री जान अचकझाई यांनी सांगितले की, सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गरज पडल्यास जखमींना कराचीलाही हलवण्यात येईल. जखमींच्या उपचाराची संपूर्ण जबाबदारी सरकार घेईल.