निंभोरा : प्रतिनिधी
रावेर तालुक्यातील सिंगत शिवारात आंदलवाडी रस्त्यावर दक्षिणेकडील शेतशिवारात एका तरुणाचा दगडाने खून करुन त्याचा चेहरा जाळन्याचा प्रयत्न करुन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आरोपीने केला असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
मिळालेल्या माहिती नुसार मयत व्यक्ती भुसावल तालुक्यातील पिप्रिसेकम गावचा असून तो याठिकाणी मजुरी काम करण्यासाठी आला होता. घटनेचे वृत्त कळताच मयत कैलास भिका पाटील वय (40) याची आई प्रमिलाबाई भिका पाटील यांनी निंभोरा पोलीस स्टेशनला अंमलदार पो हे का विकास झाबरे यांचेकडे संशईत आरोपी निलेश रमेश निकम रा. फेकरी ता भुसावळ यांच्याविरुद्ध भादवि कलम 302, 201 प्रमाणे गुन्हा नोद करण्यात आला.
पुढील तपास सपोनि गणेश धुमाळ साहेब करीत आहे. घटनास्थळी जळगाव येथील अतिरिक्त पोलीस अधीक्षक चद्रकांत गवळी फैजपूर येथील उपविभावीय अधिकारी कृणाल सोनवणे यांनी भेट दिली.