
जळगाव मिरर | ६ एप्रिल २०२६
तालुक्यातील नांद्रा बुद्रुक येथे घरी कोणीही नसतांना राहत्या घरामध्ये गळफास घेऊन रघुनाथ शंकर सोनवणे (वय ५५) यांनी आत्महत्या केली. ही घटना दि. ४ एप्रिल रोजी उघडकीस आली. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील नांद्रा बुद्रुक येथे राहणारे रघुनाथ सोनवणे हे मजुरी काम करतात. शनिवार दि. ४ एप्रिल रोजी ते घरी एकटेच असताना त्यांनी गळफास घेत आपल जीवनयात्रा संपविली. काही वेळानंतर त्यांचे भाऊ घरी आले, त्या वेळी त्यांना ते गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ दिनेश चव्हाण करीत आहेत.





















