जळगाव मिरर | १२ सप्टेंबर २०२५
जळगाव जिल्हा परिषद जळगाव अंतर्गत ८६ उमेदवारांना गट ड संवर्गातील परिचर पदावर अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती देण्यात आली. आज शुक्रवार, दि. १२ सप्टेंबर रोजी झालेल्या समुपदेशन प्रक्रियेत ही नियुक्ती आदेश देण्यात आले.
या वेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या उपस्थितीत उमेदवारांचे समुपदेशन घेण्यात आले. सदर प्रक्रिया अत्यंत पारदर्शक व सुबक पद्धतीने राबविण्यात आली असून उमेदवारांना समुपदेशनानंतर थेट नियुक्ती आदेश देण्यात आले. जवळपास वर्षभरानंतर अनुकंपा तत्त्वावर भरती प्रक्रिया राबविण्यात आल्याने उमेदवार व त्यांच्या कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले.
या कार्यक्रमाला उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.वि.) चंद्रशेखर जगताप, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विनोद चावरिया, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, उपयुक्त जिल्हा पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय डॉ. प्रदीप झोड, कृषी विकास अधिकारी पद्भ्नाभ म्हस्के यांच्यासह जिल्हा परिषदेतील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.