
जळगाव मिरर / ७ नोव्हेंबर २०२२
शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांनी काही आमदार घेत बाहेर पडल्यानंतर शिवसेनेला गळती लागली होती, पंरतु सध्या ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्याची संख्या मोठी असताना दिसून येत आहे, राज्यात विविध ठिकाणाहून नेत्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने ठाकरे गटात दाखल होत आहे. तर जळगाव ग्रामीण मतदार संघाचे रमेश माणिक पाटील यांनी हि मातोश्रीवर जात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते ठाकरे गटात प्रवेश केला आहे. या पक्ष प्रवेशामुळे जळगाव ग्रामीण मतदार संघात ठाकरे गटाला विधान सभेसाठी मोठे बळ मिळणार असल्याची चर्चा जनमानसात होत आहे.
रमेश माणिक पाटील यांनी मातोश्रीवर जात उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधत ठाकरे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे जळगाव ग्रामीण मतदार संघात आता विधानसभा ठाकरे गटाला सोपी जाणार असल्याचीही चर्चा रंगत आहे. यावेळी त्यांच्यासोबत उमेश रावसाहेब पाटील, प्रवीण कौतिक पाटील, शेतकरी नेते छोटू सुकदेव पाटील, जिल्हा अध्यक्ष कोळी सेल कॉग्रेसभाऊसाहेब सुकदेव सोनवणे, प्रहार जिल्हा नेते डॉ०.जुबेर खान, चेतन पुंडलिक सोनवणे ग्राम पंचायत सदस्य भोकर यांनी प्रवेश केला आहे. तर यावेळी जळगाव जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत, सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, महिला आघाडी जिल्हा प्रमुख महानंदा पाटील, उपमहापौर कुलभूषण पाटील, विरोधी पक्षनेते सुनिल महाजन, युवा सेना जिल्हाप्रमुख निलेश चौधरी, शरद तायडे, अँड शरद माळी, राजेंद्र ठाकरे आदी उपस्थित होते.




















