जळगाव मिरर | २८ ऑक्टोबर २०२६
बनावट कागदपत्रे तलाठी कार्यालयात देऊन मेहरुण परिसरातील व्यंकटेश कॉलनीतील ४८३.०९ चौ.मी. जागा परस्पर नावावर करून घेतला. ही घटना दि. २४ फेब्रुवारी ते दि. २२ ऑगस्ट दरम्यान घडली. या प्रकरणी वनिता कैलास पाटील (वय ४५, रा. जोशीपेठ), ममता प्रदीप पाटील (वय ३४, रा. रावेर) या दोन महिलांसह अन्य तीन अशा एकूण पाच जणांविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील मेहरुण परिसरातील व्यंकटेश कॉलनीमध्ये सुमनबाई रघुनाथ पाटील (वय ७६, रा. इंद्रप्रस्थ नगर) यांची प्लॉट क्रमांक २ मध्ये ४८३.०९ चौ.मी. जागा आहे. सदर वृद्धा सध्या खारघर, जि. रायगड येथे राहतात. त्यांच्या या जागेचे वनिता पाटील, ममता पाटील व इतर ३ जणांनी बनावट कागदपत्रे तयार केले. तीन कागदपत्रे मेहरुण तलाठी कार्यालयात देऊन ही जागा स्वतःच्या नावावर करून घेतली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर समुनबाई पाटील यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून वनिता पाटील, ममता पाटील व इतर ३ जणांविरुद्ध वृद्धा तसेच शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




















